लांजावासियांना पाणी पुरवणाऱ्या जाकवेल परिसर अस्वच्छतेची नगर पंचायतीकडून दखल
लांजा : शहराला ज्या जॅकवेल ठिकाणाहून पाणीपुरवठा होतो त्याच परिसरात अस्वच्छता प्रकरणी नगरपंचायत प्रशासन सतर्क झाले असून बेवारस जनावरे सोडणाऱ्या मालकांना तंबी दिली आहे नगरपंचायत ने एक कर्मचारी पथक नेमले आहे पाणी सभापती श्री. प्रसाद डोर्ले यांनी या धुदरें जॅकवेलच्या ठिकाणी जाऊन पाहणी केली. प्रशाशकीय अधिकारी अविराज पाटील यांनी ही या प्रकारची गंभीर दखल घेतली आहे.
गणपती मंदिर डॉगरावर क्लोरिन युनिट असून या द्वारे पाणी स्वछता केले जात आहे नगर पंचायत ने यावेळी पुरेसा टीसीएल पावडर उपलब्ध करून देण्यात येणार आहे जॅक वेल नदी पाण्यात काही म्हशी यांचा नेहमी वावर असल्याने येथिल पाणी दूषित होत असल्याचे चित्र आहे. येथील नागरिक यांच्या तक्रारी आहेत नगराध्यक्ष मात्र या विषयावर मौन बाळगून असल्याचा आरोप ठाकरे विरोधीपक्ष गटाने केला आहे नगरसेवक प्रसाद डोर्ले या ठिकाणी जाऊन आल्यानंतर सकाळी 11 ते 12 दरम्यान पुन्हा या नदीपात्रात म्हशी आढळून आल्या होत्या