वशेणी येथे उद्या महाआरोग्य शिबीर
जे. एम. म्हात्रे चॅरिटेबल ट्रस्ट व डॉ. डी वाय पाटील हॉस्पिटल व मेडिकल कॉलेज नेरुळचा उपक्रम
उरण (विठ्ठल ममताबादे ) : जे. एम. म्हात्रे चॅरिटेबल ट्रस्ट व डॉ. डी वाय पाटील हॉस्पीटल व मेडिकल कॉलेज नेरुळ नवी मुंबई यांच्या सौजन्याने तसेच आयोजक संग्राम सुनिल पाटील (ग्रामपंचायत सदस्य वशेणी) यांच्या माध्यमातून व राधाकृष्ण कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ वशेणी, जाणता राजा ग्रुप, संघर्ष ग्रुप, गुल्ली गँग, ग्रामस्थ मंडळ वशेणी यांच्या संयुक्त विद्यमाने पनवेल महानगर पालिकेचे विरोधी पक्ष नेते प्रीतमदादा म्हात्रे यांच्या वाढदिवसा निमित्त रविवार दि 15 जानेवारी 2023 रोजी जिल्हा परिषद शाळा वशेणी , खालची आळी, वशेणी, ता- उरण येथे सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत महाआरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
महाआरोग्य शिबीरात हृदयाची तपासणी, ब्लड प्रेशर, शुगर तपासणी, स्त्री रोग तपासणी, नेत्र तपासणी, कान, नाक घसा तपासणी, अस्थीरोग आदी रोगांचे मोफत तपासणी करण्यात येणार आहे.निदान होणाऱ्या सर्जरीवर महात्मा ज्योतिबा फुले व डॉ विजय डी पाटील योजनेअंतर्गत कमी दरात शस्त्रक्रिया व औषधोपचार करण्यात येणार आहे. तरी नागरिकांनी या महाआरोग्य शिबिराचा मोठया प्रमाणात लाभ घ्यावा. असे आवाहन आयोजक वशेणी ग्रामपंचायतचे सदस्य संग्राम पाटील यांनी केले आहे.