महाराष्ट्र

शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी मतदारांना ३० रोजी विशेष नैमित्तिक रजा

नवी मुंबई :  कोकण विभागाची शिक्षक मतदारसंघ द्विवार्षिक निवडणूक-2022-23 च्या निवडणूक कार्यक्रमानुसार शिक्षक मतदारसंघातील मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा म्हणून मतदानाच्या दिवशी दि. 30 जानेवारी 2023 रोजी शिक्षक मतदारांना नैमित्तीक रजा मंजूर करण्यात आली आहे.

भारत निवडणूक आयोगाकडून दि. 1 नोव्हेंबर 2022 या अर्हता दिनांकावर आधारित कोकण शिक्षक मतदारसंघासाठी नव्याने याद्या तयार करण्याचा कार्यक्रम घोषित करण्यात आला होता.  या घोषित कार्यक्रमानूसार कोकण विभाग शिक्षक  मतदार संघाच्या निवडणुकीचे मतदान सोमवार दि. 30 जानेवारी, 2023 रोजी सकाळी 8.00 ते सायंकाळी 4.00 वाजेपर्यंत या वेळेत होणार असून शिक्षक मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येण्यासाठी मतदानाच्या दिवशी विशेष नैमित्तीक रजा मंजूर करण्यात आली असून, ही रजा शिक्षक मतदारांना अनुज्ञेय असलेल्या नैमित्तीक रजेव्यतिरिक्त असणार असल्याचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी कोकण विभाग शिक्षक मतदार संघ तथा उप आयुक्त (सामान्य) मनोज रानडे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

Deepak

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button