महाराष्ट्र

शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुखपदी चैतन्य पाटील यांची निवड

डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या उरण शहर कक्षप्रमुख पदावरही नियुक्ती

उरण (विठ्ठल ममताबादे ) : रुग्ण सेवा हिच ईश्वर सेवा मानून जास्तीत जास्त गोरगरिबांना, गरजूंना चांगल्या आरोग्य सुविधा कशा पुरविता येईल यासाठी अत्यंत तळमळीने कार्यरत असलेले व गेल्या अनेक वर्षापासून आरोग्य शिबीरे भरवून गोरगरिबांच्या आरोग्यांची काळजी घेणारे उरण तालुक्यातील चिर्ले येथील सामाजिक कार्यकर्त चैतन्य गोवर्धन पाटील यांची बाळासाहेबांची शिवसेना या पक्षांतर्गत असलेल्या शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या उरण शहर कक्ष प्रमुख पदी निवड करण्यात आली आहे.

रुग्णसेवा हिच ईश्वर सेवा मानणारे चैतन्य पाटील हे केमिस्ट असोशिएशन उलवे चे सदस्य आहेत. शिवाय श्री समर्थ कृपा मेडिकल  या नावाचे त्यांचे स्वतःचे मेडिकल सुद्धा आहे. आपल्या मेडिकल मधील गोळ्या औषधे ते गोर गरिबांसाठी फ्री मध्ये देतात. अनेक वर्षापासून आरोग्य सेवेचे हे व्रत त्यांनी हाती घेतले आहे. चैतन्य पाटील यांचे विचार व कार्य पाहून त्यांची निवड शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व डॉ श्रीकांत शिंदे फांउडेशनच्चा उरण शहर कक्ष प्रमुख पदी करण्यात आली आहे. तसे नियुक्ती मा. श्री. एकनाथजी शिंदे (मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य ) यांच्या आदेशानुसार मा. श्री श्रीकांतजी शिंदे (खासदार कल्याण लोकसभा मतदार संघ )यांच्या मार्गदर्शनानुसार मंगेश चिवटे (मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष प्रमुख मंत्रालय), राम राऊत (शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष महाराष्ट्र राज्य ), ज्ञानेश्वर धुलगुडे (सहाय्यक कक्ष प्रमुख महाराष्ट्र राज्य )यांच्यातर्फे चैतन्य पाटील यांना देण्यात आले.लोकांच्या वैद्यकीय समस्या जाणून घेऊन त्यांना योग्य ते मार्गदर्शन केले जाईल.विविध आजारामध्ये शिवसेना वैद्यकीय  मदत कक्षा मार्फत व डॉ. श्रीकांत शिंदे फॉउंडेशन द्वारे निधी मिळण्यासाठी मदत केली जाईल.

गरजूना वैद्यकीय सुविधा मोफत मिळवून देण्यासाठी कामे केली जातील व विविध आरोग्य शिबीर राबवून लोकांना आरोग्याबद्दल व आजाराबद्दल  वेळोवेळी माहिती पुरवली जाईल.असे चैतन्य पाटील यांनी माहिती दिली.चैतन्य गोवर्धन पाटील यांची शिवसेना वैदयकीय मदत कक्ष व डॉ. श्रीकांत शिंदे फांउडेशनच्या उरण शहर कक्ष प्रमुख पदी नियुक्ती झाल्याने त्यांच्यावर सर्वच स्तरातून शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Deepak

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button