सद्गुरु लोकमान्य वाचनालय देवरुख आयोजित कथालेखन स्पर्धेचा निकाल घोषित
देवरू़ख ( सुरेश सप्रे) : श्री सद्गुरु लोकमान्य वाचनालय देवरुखने स्व. शालिनी आणि स्व. सदानंद बेंदरकर स्मृती प्रित्यर्थ आयोजित केलेल्या खुल्या कथालेखन स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला असून श्री अमोल अनंत पाल्ये (सडये पिरंदवणे रत्नागिरी )यांनी प्रथम क्रमांक, श्री अमित अशोक पंडित, (कनकाडी देवरुख )यांनी द्वितीय क्रमांक आणि श्री काशिनाथ सिताराम आमणे (चिपळूण )यांनी तृतीय क्रमांक पटकाविला आहे.
स्पर्धेत उत्तेजनार्थ सौ शमा सुहास प्रभुदेसाई (रत्नागिरी ), सौ श्रद्धा गजानन वझे (कल्याण ), प्रा. डॉ सौ वर्षा फाटक (देवरुख ) आणि कु. भाग्यश्री संजय महाजन (कवळाने -नाशिक ) यांच्या कथांची निवड करण्यात आली आहे.
कथालेखन स्पर्धा खुली असल्याने विविध ठिकाणाहून एकूण 17 स्पर्धकांनी आपल्या कथा स्पर्धेसाठी पाठविल्या होत्या.
कथांचे परीक्षण देसाई हायस्कूल रत्नागिरीच्या निवृत्त मुख्याध्यापिका सौ शैलजा दिवाकर लिमये यांनी केले.
सर्व यशस्वी स्पर्धकांचे अभिनंदन करण्यात येत आहे.