सर्वसमावेशक विकासावर आधारित अर्थसंकल्प : निलेश राणे
रत्नागिरी : यंदाच्या अर्थसंकल्पात समाजातील प्रत्येक घटकाच्या सर्वांगीण विकासाचे प्रतिबिंब दिसते, सर्वसमावेशक विकासावर आधारित असलेला अर्थसंकल्प देशातील प्रत्येक घटकाला विकासाच्या वाटेवर निश्चितच नेईल, अशी प्रतिक्रिया रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे माजी खासदार निलेश राणे यांनी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी देशातील प्रत्येक घटकाचा विचार केल्याचे ते म्हणाले.
केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सीतारमण यांनी लोकसभा निवडणुकी पूर्वीचे शेवटचे बजेट आज संसदेत सादर केले. या अर्थसंकल्पाचे सर्वच थरातून अभिनंदन करण्यात आले. माजी खासदार निलेश राणे यांनीही ट्वीट वरून आपली प्रतिक्रिया दिली आहे.
सर्वसमावेश विकास, वंचित घटकांना प्राधान्य, पायाभूत सुविधा आणि गुंतवणूक, क्षमता विस्तार, हरित विकास, युवक आणि आर्थिक क्षेत्राचा विकास ह्या सात मुद्यांना विकासाचा आधार मानून इंडिया@१०० ह्या दूरदृष्टीने सादर केलेला अर्थसंकल्प २०२३-२४ प्रशंसनीय आहे. याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचे धन्यवाद ! असे निलेश राणे यांचे ट्वीट आहे.