साई रिसॉर्ट प्रकरणी ‘ईडी’कडून सदानंद कदमना १५ मार्चपर्यंत कोठडी

Team RatnagiriLive
1 Min Read

शुक्रवारी दीर्घ चौकशीनंतर झाली होती अटक

दापोली : साई रिसॉर्ट प्रकरणी तक्तवसुली संचालनालयाने (ईडीने) शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांचे निकटवर्तीय व व्यावसायिक भागीदार असलेल्या सदानंद कदम  यांना १५ मार्चपर्यंत कोठडी  सुनावली आहे.

शुक्रवारी चार तास चौकशीनंतर कदम यांना ईडीने अटक केली होती. सदानंद कदम यांनी समाधानकारक उत्तर न दिल्याने त्यांना अटक करण्यात आल्याचे ईडी कडून स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच ईडीने सादर केलेल्या पुराव्यात अनिल परब यांच्या खात्यातून एक कोटी रूपये विभा साठे यांना दिल्याचे उघड झाले आहे तर सदानंद कदम यांच्या माध्यमातून ही रक्कम दिल्याचेही ईडीने म्हटलं आहे. या प्रकरणात ईडीचा युक्तिवाद कोर्टानं मान्य केला आहे. मात्र, ईडीची 14 दिवसांच्या कोठडीची मागणी न्यायालयाने फेटाळली आहे. 

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment