सेवानिवृत्त बौद्ध संस्थेमार्फत आरोस येथील गरीब मुलांना आर्थिक मदत
सावंतवाडी दि. 12 : “आमचा आधार हरवलाय, आम्हाला शिक्षणासाठी मदतीची गरज आहे” या आरोस ता. सावंतवाडी येथील मुलांनी केलेल्या आवाहनानुसार सेवानिवृत्त बौद्ध अधिकारी कर्मचारी संस्थेतर्फे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिर सभागृहात या मुलांना आर्थिक मदत करण्याचा कार्यक्रम शनिवारी संपन्न झाला.
प्रारंभी संस्थेचे सचिव मोहन जाधव यांनी प्रस्ताविक करून या मुलांनी केलेल्या आवाहनाला संस्थेने सकारात्मक प्रतिसाद देत ही छोटीशी मदत देत असल्याचे स्पष्ट केले तर अध्यक्ष सूर्यकांत कदम यांनी शिक्षणापासून कुणी वंचित राहू नये हेच संस्थेचे उद्दिष्ट असल्याचे सांगून डॉ. बाबासाहेबाचा आदर्श ठेऊन गुणवत्तापूर्वक शिक्षण घ्या, असे आवाहन केले.
यावेळी संस्थेचे कार्याध्यक्ष तथा निवृत्त उपजिल्हाधिकारी अरविंद वळंजू यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी पालक रुक्मिणी ओरोसकर, पाल्य सायली यांनीही मनोगत व्यक्त करून कृतन्यता व्यक्त केली. शेवटी वासुदेव जाधव यांनी आभार मानले. यावेळी श्रद्धा कदम, रमेश कदम, सिद्धार्थ कदम, नरेश जाधव इ. उपस्थित होते.
यावेळी दीपक पडेलकर, भिकाजी वर्देकर, पी. एल. कदम, ममता मोहन जाधव, सागर शशिकांत गमरे, कांता जाधव, सिद्धार्थ कदम, निखिल अनंत कदम, ओंकार तुळसुलकर, सिद्धार्थ गोपाळ तांबे, डॉ. महेश पेडणेकर, सिद्धार्थ भिवा जाधव इत्यादींनी आर्थिक मदत केली.