Adsense
महाराष्ट्र

सोनाली बुंदे यांचे स्पर्धा परीक्षेबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

उरण (विठ्ठल ममताबादे ) : रायगडचे जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर (भा.प्र. से) यांच्या संकल्पनेतून स्पर्धा परीक्षा अभ्यासिका मुख्याधिकारी राहुल इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली वाचनालयाचे ग्रंथपाल संतोष पवार यांनी उरण नगरपरिषदेचे माँ साहेब मीनाताई ठाकरे वाचनालयात डॉ. पंजाबराव देशमुख अकादमी, अमरावती या संस्थेचे राज्याच्या समन्वयक सोनाली बुंदे आणि धीरज रामदास बुंदे यांचे यूपीएससी ,एमपीएससी आणि इतर स्पर्धा परीक्षेची तयारी या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रंथपाल संतोष पवार यांनी केले. या कार्यक्रमाला निवृत्त सहाय्यक आयुक्त सुधाकर पाटील (IRS) केंद्रीय उत्पादन शुल्क विभाग उपस्थित होते. सदर कार्यक्रम उरण शहरातील विमला तलावा जवळ असलेल्या माँ साहेब मीनाताई ठाकरे वाचनालय येथे चालवल्या जाणाऱ्या अभ्यासिकेमध्ये संपन्न झाला. या कार्यक्रमात नियमित येणाऱ्या विद्यार्थ्यांनी सर्वार्थाने सहभाग घेतला. सोनाली बुंदे यांना विविध शंका विचारल्या या शंकांचे समर्पक शब्दांत बुंदे मॅडमनी शंकांचे निरसन केले. अतिशय अभ्यासपूर्ण वातावरणात हा उपक्रम यशस्वीपणे पार पाडण्यात आला.

कार्यक्रमाचे शेवटी विद्यार्थ्यांनी सोनाली बुंदे आणि धीरज बुंदे यांचे महिन्यातून दोन तास आम्हांस आपली उपलब्धता होण्यासंदर्भात विनंती केली यावर सोनाली बुंदे यांनी यास सहमती दर्शविली. विद्यार्थी या कार्यक्रमाबद्दल समाधानी झाले होते. त्यांनी आपल्या भावना मनोगतातून व्यक्त केले. या कार्यक्रमाचे आयोजन उरण नगरपरिषदेचे मीनाताई ठाकरे वाचनालयाने केल्याबद्दल विद्यार्थ्यांनी आयोजकांचे आणि व्याख्यात्यांचे आभार मानले.

In article

Deepak

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button