स्त्रीशक्ती सन्मानार्थ दापोलीत उद्या दापोलीत रणरागिणींची सायकल रॅली
स्त्री शक्तीचा सन्मान आणि महिला सबलीकरण जनजागृतीसाठी दापोलीत १२ मार्चला उपक्रम
दापोली : महिलांच्या सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक कामगिरीचा गौरव करण्यासाठी दरवर्षी ८ मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपली भूमिका योग्य पद्धतीने साकारणाऱ्या आपल्या आई, बहीण, पत्नी, मुलगी, मैत्रिण, शिक्षिका इत्यादींप्रती आभार व्यक्त करण्यासाठी आणि त्यांचा गौरव, सन्मान करण्यासाठी दापोली सायकलिंग क्लबतर्फे रविवारी, १२ मार्च २०२३ रोजी सायकल फेरीचे आयोजन करण्यात आले आहे.
ही सायकल फेरी आझाद मैदान दापोली येथून सकाळी ७:३० वाजता सुरु होईल. ती उपजिल्हा रुग्णालय- एसटी आगार- पोलीस स्टेशन- बाजारपेठ- पोस्ट ऑफिस- शिवाजीनगर- नवभारत छात्रालय- आझाद मैदान अशी ६ किमीची असेल. समारोप आझाद मैदान येथे ९:३० वाजता होईल. या सायकल फेरी दरम्यान या मार्गावर राहणाऱ्या आणि दापोलीच्या जडण घडणीमध्ये महत्वाचे योगदान दिलेल्या काही महिलांचा गौरव करुन त्यांचे आभार मानण्यात येतील.
या सायकल फेरीसाठी कोणतेही प्रवेश शुल्क नाही. सर्व वयोगटातील सायकल प्रेमी सहभागी होऊ शकतात. अधिक माहितीसाठी संपर्क नंबर ८६५५८७४४८६, ८७६७६५०५३७ हे आहेत. सायकल संस्कृती वाढावी व सायकल बद्दल आवड निर्माण व्हावी, या हेतूने दापोली सायकलिंग क्लबतर्फे विनामूल्यपणे सायकल विषयक अनेक उपक्रम राबवले जातात. सर्वांनी यामध्ये सहकुटुंब, सहपरिवार सहभागी व्हा आणि आपल्या दैनंदिन जीवनात सायकलचा अधिक वापर करा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.