स्वा. सावरकरांच्या ‘हिंदुत्व’ ग्रंथाच्या शताब्दी वर्षानिमित्त २५ फेब्रुवारीला रत्नागिरीत जाहीर व्याख्यान
रत्नागिरी : स्वा. सावरकर यांचे प्रदीर्घ वास्तव्य आपल्या रत्नागिरीमध्ये होते . या कालखंडातील सावरकरांचे समाजसुधारणाचे कार्य हिंदुसमाज आणि एकूणच देशहितासाठी अपूर्व आहे. रत्नागिरीमधील आपल्या वास्तव्यात हिंदूसमाजातील जातीभेद, विषमता, अस्पृश्यता आणि यांसारख्या वाईट प्रथा चालीरीती नाहीशा व्हाव्यात यासाठी असंख्य उपक्रम राबविले. असंख्य भाषणे, विपुल लेखन केले. वीर सावरकरांचे तसं सगळं लेखन वाङमय अद्भुत आहे. आणि त्यातही त्यांनी लिहीलेल्या हिंदुत्व या ग्रंथाचे महत्व आगळेवेगळे आहे.
हिंदुत्वाची वैशिष्ट्यपूर्ण, सुप्रसिद्ध व्याख्या याच ग्रंथात त्यांनी सिद्ध केली. अशा या ग्रंथाला या वर्षी १०० वर्षे पूर्ण होत आहेत. आपल्यासाठी विशेष म्हणजे या ग्रंथाचे लेखन आपल्या रत्नागिरीतील कारागृहात केलेले आहे.
यानिमित्ताने वीर सावरकरांच्या पुण्यतिथीच्या पूर्वसंध्येला आपल्या ॐ साई मित्र मंडळाच्या वतीने शनिवार, २५ फेब्रुवारी २०२३ या दिवशी सायंकाळी ५ वाजता ॐ साई मित्रमंडळ, साळवी स्टॉप-नाचणे लिंक रोड, रत्नागिरी येथे राजापूर येथील सावरकरप्रेमी श्री. दिलीप गोखले यांचे व्याख्यान आयोजित केले आहे.
वीर सावरकरांचे हिंदुत्वाचे विचार १०० वर्षांपूर्वी जेवढे महत्वाचे होते तितकेच ते आजही आहेत आणि भविष्यातही हिंदुसमाजाला मार्गदर्शक ठरतील. सामाजिक दोष नाहीसे होऊन हिंदूहित आणि अर्थातच राष्ट्रहितासाठी उपयोगी ठरतील, यात संशय नाही. वीर सावरकरांच्या हिंदुत्व विचारांच्या जागरणासाठीच या व्याख्यानाचे आयोजन आपल्या मंडळाने केले आहे. समस्त सावरकरप्रेमी नागरिक बंधुभगिनींनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला वेळात वेळ काढून वेळेवर उपस्थित रहावे आणि मंडळाच्या समाज प्रबोधनाच्या हेतूने योजलेल्या उपक्रमाला प्रोत्साहित करावे. अधिक माहितीसाठी 9422630969 / 9730310799 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन ओम साई मित्र मंडळातर्फे करण्यात आले आहे.