हळदीकुंकूवाच्या माध्यमातून विधवा भगिनींचा सन्मान!

Team RatnagiriLive
1 Min Read

उरण (विठ्ठल ममताबादे ) : द्रोणागिरी नोड मधील प्रजापती मग्नम वसाहतीमध्ये हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महिलांनी आपले वेळेचे योगदान देऊन सडा, रांगोळी, शृंगार रूपात पारंपरिक वेशात हळदीकुंकू, वाण लुटून त्याचबरोबर संवाद, ओळख, अल्पोहार, क्षणचित्रे, अन्ताक्षरी, रील्स, हास्यकल्लोळ, असा दिमाखदारात समारंभ संपन्न झाला. या हळदीकुंकू कार्यक्रमाचे औचित्य साधून विशेष म्हणजे समाज परिवर्तन म्हणून विधवा मैत्रिणींना सन्मानीत करण्यात आले.

समाजात त्यांना मानाचे स्थान मिळावे म्हणून विधवा भगिनीचा सत्कार करण्यात आला. विधवा भगिनीं कुठेही त्यांच्या कर्तबगारीत त्या कमी नसतात हा संदेश समाजाला हळदी कुंकू कार्यक्रमातून देण्यात आला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून हळदीकुंकू समारंभ विविधतेने संप्पन्न झाला.
Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment