देवरुख व्यापारी संघाचे अध्यक्ष बाबा सावंत आदर्श व्यापारी पुरस्कार प्रदान

Team RatnagiriLive
1 Min Read

देवरुख (सुरेश सप्रे) : दै. नवराष्ट्र तर्फे उल्लेखनीय काम करणाऱ्या विविध क्षेत्रातील कामगिरीबद्दल दिला जाणारा आदर्श उद्योजक (व्यापारी) पुरस्कार देवरूख व्यापारी संघाचे अध्यक्ष प्रसाद उर्फ बाबा सावंत यांना रत्नागिरी येथील सावरकर नाट्यगृह येथे रत्नागिरीचे पालकमंत्री मा.उदय सामंत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

यावेळी दै. नवराष्ट्रचे रत्नागिरी आवृत्ती प्रमुख प्रभाकर वाडकर आदी मान्यवर उपस्थितीत होते. पुरस्कार मिळालेने बाबा सावंत यांचे आम. शेखर निकम. राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य चिटणीस बारक्याशेठ बने, शहर अध्यक्ष हनिफ हरचिरकर. माजी जिप अध्यक्ष रोहन बने. मोहन वनकर आदिंसह अनेकांनी अभिनंदन केले..

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment