हेमंत भोईर यांची बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या उरण उपतालुका प्रमुखपदी निवड
उरण (विठ्ठल ममताबादे ) : राष्ट्रीय कामगार नेते तथा जे.एन. पी. टी. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे माजी अध्यक्ष हेमंत भोईर यांची “बाळासाहेबांची शिवसेना” या पक्षाच्या उरण उपतालुका प्रमुखपदी निवड करण्यात आली आहे. नियुक्तीपत्र देताना कर्जतचे आमदार तथा रायगड जिल्ह्य प्रमुख महेंद्र थोरवे तसेच रायगडचे उप-जिल्ह्य प्रमुख अतुलशेठ भगत यांनी त्यांचे अभिनंदन केले व पक्ष वाढीसाठी खूप प्रयत्न करून उरण तालुक्यात “बाळासाहेबांची शिवसेना” या पक्षाला बळ देण्यासाठी खूप- खूप मेहनत घेऊन पक्ष संघटना मजबूत करण्याच्या सुचना केल्या.
नवनिर्वाचित उप-तालुका प्रमुख हेमंत भोईर यांनी त्याच्या भावना व्यक्त करताना वरिष्ठांनी माझ्यावर दिलेल्या “उप-तालुका प्रमुख” या जबाबदारीला साजेल असे कार्य करून उरण तालुक्यातच नव्हे तर रायगड जिल्ह्यात पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करण्याचे आश्वासन वरिष्ठांना दिले.
हेमंत भोईर यांची शिवसेना उप-तालुका प्रमुख पदी नियुक्ती झाल्याचे समजताच त्यांच्यावर तालुक्यातूनच नव्हे, तर रायगड जिल्ह्यातून सुद्धा त्यांच्या चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.