मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन या स्थानकावरून धावणार!

Team RatnagiriLive
1 Min Read

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट  असलेल्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गावर एकूण १२ स्थानकांची नावे समोर आली आहेत.

मुंबई ते अहमदाबाद हा ५०८ किलोमीटर लांबीचा हा प्रवास महाराष्ट्र, गुजरात आणि दादरा- नगर हवेलीमधून केला जाईल. या बुलेट ट्रेनचा रूट मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्सपासून सुरू होतो तर अहमदाबादमधील साबरमती येथे शेवटचं स्टेशन आहे. यादरम्यान हि बुलेट ट्रेन ठाणे, विरार, बोईसर, वापी, बिलीमोरा , सुरत ,भरूच आणि वडोदरा येथे थांबणार आहे.

विरार: पालघर जिल्ह्यात असलेल्या विरारमधून बुलेट ट्रेन जाईल. हे महाराष्ट्रातील तिसरे स्टेशन असेल.

बोईसर: विरार यानंतर पुढचे स्टेशन (Mumbai Ahmedabad Bullet Train) असेल ते म्हणजे बोईसर.

वापी: वापी गुजरातमधील पहिले स्टेशन, वापी हे एक महत्त्वाचे व्यावसायिक केंद्र आहे.

बिलीमोरा: नवसारी जिल्ह्यातील या स्टेशन मुळे पर्यटनाला चालना मिळेल.

सुरत: सुरत हे गुजरातमधील एक प्रमुख व्यावसायिक शहर असून याठिकाणी बुलेट ट्रेनसाठी महत्वाचा थांबा असेल.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment