विंधने कातकरी वाडीवर स्वच्छता अभियान
सरपंच निसर्गा डाकी यांनी केली स्वच्छतेला सुरुवात
उरण (विठ्ठल ममताबादे ) : कोकण विभागीय आयुक्त डॉ महेंद्र कल्याणकर, जिल्हाधिकारी रायगड डॉ. योगेश म्हसे, उप विभागीय अधिकारी राहुल मुंडके, प्रकल्प अधिकारी श्रीमती शशिकला अहिरराव, तहसीलदार उरण भाऊसाहेब अंधारे यांच्या मार्गदर्शनाखाली कातकरी उत्थान सप्तसूत्री कार्यक्रमा अंतर्गत रविवार दिनांक 12/02/2023 रोजी उरण तालुक्यातील विंधणें कातकरी वाडी येथे उरण सामाजिक संस्थेच्या माध्यमातून सफाई अभियान राबविण्यात आले.
हे सफाई अभियान प्रथम टप्प्यात उरण तालुक्यात राबविण्यात येणार आहे.उरण तालुक्यातील सर्व वाड्या नंतर रायगड जिल्ह्यातील इतर तालुक्यात हे अभियान राबविणार आहे . या अभियानाची संकल्पना सामाजिक कार्यकर्ते नामदेव ठाकूर, सुनील जोशी, रायगड भूषण दत्ता गोंधळी, मनीष कातकरी यांची आहे. सदर सफाई अभियानाची प्रा. राजेंद्र मढवी यांनी रूपरेषा आखली आणि गोपाळ पाटील गुरुजी यांनी मार्गदर्शन केले. तसेच वाडी वरील सर्व आदिवासी महिलांनी उत्स्फूर्त मेहनत घेतली आणि सर्व परिसर स्वच्छ केला. सफाई अभियानास सहकार्य करणाऱ्या सर्वांचे यावेळी आभार मानण्यात आले.
यावेळी सरपंच निसर्गा डाकी,प्राध्यापक राजेंद्र मढवी,नामदेव ठाकूर,सुनील जोशी,दत्ता गोंधळी,मनीष कातकरी यांच्यासह कातकरी समाज बांधव उपस्थित होते.