अग्निवीरवायू भरतीसाठी २७ रोजी गुगल मीटवर ऑनलाईन मार्गदर्शन सत्र
अलिबाग : देशातील तरुणांना भारतीय वायूसेनेत दाखल होऊन देशसेवा करण्याची एक उत्तम संधी म्हणजे ‘अग्निवीरवायू ‘ भरती प्रक्रिया होय. दि. 17 मार्च ते 31 मार्च 2023 मध्ये ह्या भरती प्रक्रियेसाठी अर्ज दाखल करता येणार आहेत. याविषयीची अधिक माहिती उमेदवारांपर्यंत पोहोचण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, रायगड-अलिबाग यांच्या वतीने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त वायूसेनेच्या अग्निवीरवायू या स्पर्धा परिक्षेसाठी ऑनलाईन मार्गदर्शक सत्र आयोजित केले आहे.
‘अग्निवीरवायू भरती प्रक्रिया ‘ या विषयावरील ऑनलाईन सत्र सोमवार, दि.27 मार्च 2023, रोजी सकाळी 11 वाजता गुगल मीट लिंक: https://meet.google.com/haz-ggqb-rif या प्लॅटफॉर्मवर आयोजित केले आहे. या सत्रामध्ये भारतीय वायूसेनेचे विंग कमांडर, CO, 6 ASC, मुंबई श्री.दिनेश कुमार यादव हे सहभागी उमेदवारांना या भरती प्रक्रियेचे टप्पे, स्पर्धा परीक्षा, त्यांची तयारी अशा विविध विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत.
जिल्ह्यातील तरुणांनी या मार्गदर्शन सत्राचा लाभ घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त श्रीमती.अमिता मु.पवार यांनी केले आहे.