घड्याळाचे ठोके चुकले!! राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द!
नवी दिल्ली : निवडणूक आयोगाने आम आदमी पार्टी अर्थात ‘आप’ला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा दिला आहे. तृणमूल काँग्रेस, सीपीआय, NCP चा राष्ट्रीय दर्जा काढला आहे.
भारतीय निवडणूक आयोगाने १० एप्रिल रोजी आम आदमी पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा दिल्याने अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाला एक प्रकारे सुखद धक्का बसला आहे.
भारतीय निवडणूक आयोगाने (ECI) 10 एप्रिल 2023 रोजी तृणमूल काँग्रेस, भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय दर्जा काढून घेतला आहे.
एनसीपी, सीपीआय आणि टीएमसी या पक्षांचा राष्ट्रीय पक्ष म्हणून असलेल्या दर्जा काढून टाकल्यानंतर, आता देशात फक्त सहा राष्ट्रीय पक्ष उरले आहेत. त्यामध्ये भाजप, काँग्रेस, नॅशनल पीपल्स पार्टी, सीपीएम, बहुजन समाज पार्टी आणि आता यात नव्याने अंतर्भाव झालेल्या आम आदमी पक्षाचा समावेश आहे.