राष्ट्रीय
प्रशिक्षित ‘आपदा मित्रां’ना प्रमाणपत्र, लाईफ जॅकेटचे वाटप
अलिबाग : आपदा प्रशिक्षण शिबिराचा लाभ घेतलेल्या आपदा मित्रांना आज राजस्व सभागृह येथे आयोजित विशेष कार्यक्रमात विभागीय आयुक्त तथा रायगड जिल्हाधिकारी तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या हस्ते प्रमाणपत्र, लाईफ जॅकेट प्रदान करण्यात आले.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे, महाड प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड, पेण प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार, माणगाव प्रांताधिकारी उमेश बिरारी, श्रीवर्धन प्रांताधिकारी अमित शेडगे, महाड तहसिलदार सुरेश काशीद,जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक व आपदा मित्र उपस्थित होते.