महाराष्ट्ररेल्वे अपडेट्स & ट्रॅव्हललोकल न्यूज
Konkan Railway | दादर-सावंतवाडी तुतारी एक्सप्रेस उद्यापासून नांदगाव स्थानकावर थांबणार!
रेल्वे बोर्डाकडून प्रायोगिक तत्त्वावर थांबा मंजूर
रत्नागिरी : दादर ते सावंतवाडी ही कोकण रेल्वे मार्गे धावणारी तुतारी एक्सप्रेस (११००३/११००४) दिनांक ४ ऑगस्ट २०२३ पासून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नांदगाव स्थानकावर थांबा घेणार आहे. कणकवली तसेच अचिरणेदरम्यान असलेल्या नांदगाव स्थानकावर हा प्रायोगिक हातावर थांबा देण्यात आला आहे.
या संदर्भात कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार दादर ते सावंतवाडी दरम्यान धावताना तुतारी एक्सप्रेस सकाळी ९ वाजून 48 मिनिटांनी नांदगाव स्थानकावर येईल तर सावंतवाडी ते दादर दरम्यान धावताना सायंकाळी ७ वाजून ०४ मिनिटांनी तुतारी एक्सप्रेस नांदगाव स्थानकावर येईल.
रेल्वे बोर्डाने प्रायोगिक तत्वावर नांदगाव स्थानकावर तुतारी एक्सप्रेसला थांबा देण्याचा निर्णय जाहीर केला आहे.