महाराष्ट्र

उरण पोलीस ठाणे आयोजीत हळदीकुंकू समारंभ उत्साहात संपन्न

उरण (विठ्ठल ममताबादे ) : 14 फेब्रुवारी म्हणजे प्रेमाचा दिवस आणि अश्या गोड दिवशी उरण पोलीस स्टेशन यांनी आपल्या उरण तालुक्यातील सर्व महीला भगिनी साठी सौभाग्याचे लेने असलेल्या हळदीकुंकू समारंभाचे नियोजनबद्ध व सुंदर अशा कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भावनताई घाणेकर (राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश) यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून कार्यक्रमास गोड अशी सुरवात झाली.
उरण महिला पोलीस पी एस आय गायकवाड अंजना, पोउपनि पदमजा पाटील, मपोहवा रचना ठाकूर, मपोहवा प्रदेवी पाटील, मपोना प्रिती म्हात्रे, मपोशी प्रियंका पाटील, मपोशी सुरेखा राठोड, मपोशी वैशाली पाटील यांनी सर्व महीला भगिनी यांना हळदीकुंकू वहाण देऊन पुजन केले. मान्यवर महिला भगिनीचे महिला सक्षमीकरण विषयी भाषणे झाली. त्या वेळी उरण पोलीस ठाणे हद्दीत एका लहान पाच वर्षांच्या मुलीवर एका नराधमाने अत्याचार केला.त्यामुळे संपूर्ण दिवसभर भावना ताई त्या लहानग्या चिमुकलीला घेऊन उरण पोलीस स्टेशन मध्ये न्यायासाठी त्या जातीने हजर राहून त्या नराधमाने केलेल्या दुषकृत्याची सजा उरण वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्याकडे तक्रार करुन त्या नराधमाला जेर बंद करुनच या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भुषवीण्या साठी उपस्थित राहील्या .उरण पोलीस स्टेशन आयोजित हळदीकुंकू हा महिलांसाठी दरवर्षी आनंददायी, स्मरणीय पर्वणीच असतो.
तदनंतर संगीत खुर्ची ,बलुन गेम, नाचगाणी असा रंगतदार कार्यक्रमात गायक देवेंद्र पाटील, वृषाली पाटील यांनी गायक केले.प्रिती भोजनही झाले.
कार्यक्रमासाठी उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पाटील, भावना ताई घाणेकर,माजी नगराध्यक्ष सायली म्हात्रे, सीमा घरत, विमल पाटील, नायदा ठाकुर, आफशा मुकरी , कुसुम ठाकूर, लीना पाटी,मजल, वर्षा म्हात्रे, दिपाली पाटील, लता पाटील, रुपाली खाडे, अरुणा घरत, रेणुका पाटील, वंदना कोळी,सामीया बुबेरे,उरण पोलीस स्टाफ, सर्व महिला भगीणी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Team RatnagiriLive

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button