आगामी जि. प. निवडणुकीत भाजपाचे उमेदवार जास्तीत जास्त निवडून आणूया : नीलेश राणे
भांबेड जि प गटातील भाजपा कार्यालयाचे नीलेश राणे यांच्या हस्ते उद्घाटन
उद्धव ठाकरे गटातील कार्यकर्त्यांचा भाजपा पक्ष प्रवेश
लांजा : भारतीय जनता पार्टीच्या भांबेड जि प गटातील संपर्क कार्यालयाचे उद्घाटन रविवारी 26 फेब्रुवारी रोजी भाजपाचे प्रदेश सचिव तथा माजी खासदार नीलेश राणे यांच्या हस्ते झाले. या निमित्ताने माझी खासदार निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली भांबेड गटातील १०० हून अधिक शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी भाजपात जाहीर प्रवेश केला. या सर्वांचे माजी खासदार निलेश राणे यांनी स्वागत केले.
भांबेड जिल्हा परिषद गटातील भाजपाच्या या पहिल्या कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी व्यासपीठावर माजी खासदार नीलेश राणे यांच्यासह भाजपा नेत्या उल्का विश्वासराव, मुंबई येथील नगरसेवक महादेव शिवगण, भाजपा जिल्हा संघटन सरचिटणीस राजेश सावंत, लांजा तालुका अध्यक्ष महेश खामकर, उद्योग आघाडी जिल्हाध्यक्ष श्री. मुकुंदराव जोशी, अनुसूचित आघाडीचे जिल्हाध्यक्ष श्री. मारूती कांबळे, ओबीसी सेल तालुकाध्यक्ष दादा भिडे ,जिल्हा सरचिटणीस इकबाल गिरकर, लांजा शहराध्यक्ष प्रमोद कुरूप, येथील नगरसेवक संजय यादव, मंगेश लांजेकर , तालुका उपाध्यक्ष चंद्रकांत मांडवकर , तालुका सरचिटणीस विराज हरमले तसेच शंकर गांधी, श्रीकांत ठाकूर देसाई, प्रमोद गुरव, भरत कोळवणकर, बुवा राणे महेश गांगण आधी उपस्थित होते.
कार्यालयाचे उद्घाटन निलेश राणे यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. यानंतर तालुकाध्यक्ष महेश खामकर तसेच नेत्या उल्का विश्वासराव यांच्या हस्ते माजी खासदार निलेश राणे यांचा शाल,श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना माजी खासदार निलेश राणे यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत जास्तीत जास्त भाजपाचे सदस्य निवडून आणणार. इथल्या जनसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी उल्काताईंच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत. राणे श्रेय घेऊन नाही तर कामे करून मोठे झाले आहेत. आम्हाला तुमची साथ हवी आहे. आमच्याकडे केंद्रात मोदी साहेबांसारखे व्रतस्थ नेतृत्व आहे तर राज्यात देवेंद्रजी खंबीरपणे आपल्या मागे उभे आहेत असेही ते म्हणाले.
यानंतर उल्काताई विश्वासराव यांनी आपल्या भाषणातून जोरदार फटकेबाजी केली. “जि.प . गटाचा कायापालट करणे हाच एकमेव उद्देश डोळ्यांसमोर आहे. त्यामुळे विरोधकांच्या कोणत्याही गोष्टींना गांभीर्याने घेऊन त्यांना उत्तरे देण्यासाठी वेळ फुकट घालवणार नाही. या गटात पायाभूत सुविधा उपलब्ध करणे, नवउद्योजकांना प्रेरित करून त्यांच्या माध्यमातून रोजगार निर्मिती करणे आणि लोककल्याणकारी योजनांचा लाभ सर्वसामान्य व्यक्तींना मिळवून देणे या त्रिसूत्रीवर पुढील काळात कार्य करणार आहे. तुमच्यासारखे अजूनही लोक भविष्यात माझ्यासोबत जोडले जातील याबाबत मी निश्चिंत आहे असे त्या म्हणाल्या.
कार्यक्रमाला मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
शेकडो ग्रामस्थांसहित उबाठा गटातील पदाधिकाऱ्यांचा भाजपामध्ये जाहीर प्रवेश
येणार्या काळात गावातील आणि जिल्हा परिषद गटातील राजकीय परिस्थिती ओळखून उल्काताई विश्वासराव यांच्या विकासात्मक कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून असंख्य कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. यामध्ये भांबेड गावातील ९ वाड्यांचा कोळे बूथ, जो कालपर्यंत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात होता, आज माजी खासदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत माजी शाखाप्रमुख सचिन शिवगण, मुंबईस्थित अनंत शिवगण, कमलाकर शिवगण, रूपेश सोलकर, पंढरी मडवी, तुकाराम दैत, शंकर शिवगण, प्रकाश मडवी यांच्यासोबत जवळपास शंभरहून अधिक ग्रामस्थांनी भाजपा प्रवेश केला. यासाठी चेंबूरचे माजी नगरसेवक महादेव शिवगण यांनी योगदान दिले.