सायन्स & टेक्नॉलॉजी

संगमेश्वर तालुक्यातील तुरळच्या नीरज इनामदारची ‘नासा’कडे भरारी!

लवकरच अमेरिकेला होणार रवाना

देवरूख (सुरेश सप्रे) : संगमेश्वर तुरळ सुवरेवाडी मराठी शाळेतील विद्यार्थी नीरज मनोज इनामदारने इस्त्रो /नासा भेटीसाठी तालुक्यात प्रथम क्रमांक प्राप्त करत अमेरिकेला प्रयाण करणार आहे.


संगमेश्वर तालुक्यातील तुरळ येथील विद्यार्थी कु. नीरज मनोज इनामदार हिची ईसरो (बेंगलोर) व नासा (अमेरीका) भेटी करीता रत्नागिरी जिल्ह्यातून निवड झाल्याबद्दल समस्त जिल्ह्यातून कौतुक होत आहे. नीरज हा पुर्ण प्राथमिक मराठी शाळा तुरळ सुवरेवाडी ५ वी इयत्ता मध्ये शिकत असुन शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद रत्नागिरी अंतर्गत “जाणू विज्ञान अनुभवू विज्ञान”नासा (NASA) आंतरराष्ट्रीय अंतराळ संशोधन केंद्र (अमेरीका) व (ISRO) भारतीय अवकाश संशोधन केंद्र (बेंगलोर) भेट चाळणी परीक्षा उपक्रम राबविण्यात आला. या परीक्षेत संगमेश्वर तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावत तुरळच्या निरज इनामदार याची (बेंगलोर) व नासा (अमेरिका) भेटी करीता रत्नागिरी जिल्ह्यातुन निवड करण्यात आली आहे. त्याला शाळेतील शिक्षक संदीप कुंभार यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.


त्याच्या उत्तुंग अशाबद्दल तुरळ गावात शाळेच्या विद्यमाने गुणगौरव व कौतुक समारंभ मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.त्या वेळेस विस्तार अधिकारी विनायक पाध्ये. केंद्रप्रमुख धुळप. मुख्याध्यापिका सौ. दुर्गा भोजने तसेच सर्व शिक्षक वृंद व पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.

Deepak

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button