जगाच्या पाठीवर

विदेशी पाहुण्यांनी घेतली सृष्टीज्ञान, सह्याद्री संकल्प सोसायटीच्या कामांची घेतली माहिती!


देवरूख (सुरेश सप्रे) : संकल्प सोसायटी या स्वयंसेवी संस्थांच्या सृष्टीज्ञान व सह्याद्री संकल्प यांची संगमेश्वर तालुक्यात चाललेल्या कामाची माहिती घेण्यासाठी स्वीडन हुन अलिल्या २४ विद्यार्थी व शिक्षक यांच्या समुहाने मारळमधिल वनालिका इंकॉलॉजीकल फार्मला भेट दिली.

आमदार शेखर निकम. माजी सभापती सौ. पूजा निकम. महाराष्ट्रातील फेमस कॉमेडी किंग प्रभाकर मोरे यांची प्रमुख उपस्थिती झालेल्या कार्यक्रमात आमदार शेखर निकम यांनी मतदारसंघात चाललेल्या सेंद्रीय शेती, वृक्षलागवड, तापमान वाढीचा शेती व बागायतीवर होणारा परिणार्य, वारंवार येणारे पूर सहयाद्री खोर्‍यात कोसळणाऱ्या दरडी याबाबत परदेशी युवकांना माहिती दिली. जागतीक तापमान वाढीच्या संकटाला तोंड देण्यासाठी पारंपारीक भात बियाणी टिकविणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन करून त्यासाठी संस्थेच्या सहकार्याने “भात बियाणे बँक” उभारण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे आ. निकम सांगितले

सहयाद्री संकल्प सोसायटीचे अध्यक्ष संजीव अणेराव यानी गेली ३५ वर्षे सहयाद्रीमधीक जंगले वाचविण्यासाठी केलेली आंदोलन व वृक्षतोडीमुळे नदया, वन्यजिव व जैव विविधनवर होत असलेल्या गंभीर परिणामांची माहीती देत संस्था पातळीवर चालू असल्या कामाची माहिती विद्यार्थ्यांशी हितगुज साधताना दिली.
यावेळी, खासकरून उपस्थित असलेले अभिनेते प्रभाकर मोरे यांनी त्यांच्या खास शैलीत ” शालू झोका देग मैना’ हे गाणे साभीनय सादर करून परदेशी पाहुण्यांना ठेका धरायला लावला. या निमित्ताने कोकणातील पारंपारीक कला संस्कृतीची ओळलं परदेशी पाहुणेंनाकरून दिली.
कोकणातील आंबा, काजू, नारळ या फळपिकांवर होत असलेले हवामान बदलाचे गंभीर दुष्परिणामांची माहिती सह्याद्री संकल्प सोसायटीचे प्रा. डॉ. प्रताप नाईकवडे, सुबोध व मानब अणेराव यानी दिली. फार्मच्या मसाला पिकांच्या सेंद्रीय शेती प्रकल्पाला पाहुण्यानी भेट दिली.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सृष्टीज्ञान संस्थेच्या संगीताताई खरात यांनी केले तरडॉ. प्रा. प्रताप नाईकवडे यानी सहयाद्री संकल्प सोसायटीच्या उपक्रमांची माहिती दिली. संकल्प सोसायटीने संरक्षित घरट्यांना “हॉर्नबिल”पक्षांच्या संग्रहालयला परदेशी पाहुण्यांनी भेट देवून निसर्ग संरक्षक प्रतिक मोरे यांना या प्रकल्पाची माहिती दिली.
या कार्यक्रमाला २५ स्विडीश विद्यार्थ्यांसह वनालिका फार्म चे सुबोध व मनिष अणेराव सृष्टी ज्ञान संस्थेचे कार्यकारी संचालक प्रशांत शिंदे, , कुणाल अणेराव, ज्योती सोपकर प्रतिक मोरे, अभिजित पाटील, केतकी फाटक,उपस्थित होते

Deepak

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button