आइस स्टॉक स्पर्धेत रायगडच्या खेळाडूंचा दणदणीत विजय
उरण (विठ्ठल ममताबादे ) : नुकतीच 22 जानेवारी 2023 रोजी प्रसाद लॉन,औरंगाबाद (संभाजीनगर) येथे 4 थी महाराष्ट्रा राज्य आइस स्टॉक स्पर्धा 2023 व खेलो इंडिया विंटर गेम्स सिलेशन मोठया जलोषात संपन्न झाले.त्यात एकूण 20 जिल्ह्यांतिल 130 हुन अधिक खेळाडूंनी समावेश घेतला होता. त्याचे उदघाटन अध्यक्ष महेश राठोड, सचिव अजय सर्वदय , सोमेश सनदी व इतर सर्वा जिल्हा प्रतिनिधी यांच्या हस्ते करण्यात आले.
हा खेळ 14,17, वर्षा खालील व 17 वर्षा वरील मुले/मुली वैयक्तिक व सांघिक आणी सांघिक खेळ,सांघिक टार्गेट, सांघिक डिस्टन्स व वैयक्तिक टार्गेट,वैयक्तिक डिस्टन्स आशा 5 प्रकारात खेळण्यात आला.
रायगड जिल्ह्यातून एकूण 5 खेळाडूंनी सहभाग घेतला व त्यांनी आपल्या खेळाचा सुंदर प्रदर्शन दाखवत दणदणीत विजय मिळविला. त्यांची नावे खालील प्रमाणे
वैयक्तिक खेळ
1) दिक्षा अरविंद जैन :- वैयक्तिक टार्गेट :- सुवर्ण पदक, वैयक्तिक डिस्टन्स :- रौप्य पदक
2) शुभम म्हात्रे :- वैयक्तिक डिस्टन्स :- सुवर्ण पदक
3) केदार अशोक खांबे :-वैयक्तिक टार्गेट कास्य पदक.
सांघिक खेळ व सांघिक टार्गेट दोन्ही खेळात कास्य पदक मिळविले त्यांची नावे खालील प्रमाणे.
केदार आशिक खांबे,शुभम म्हात्रे,आकाश भिडे,जयेश चोगले.
स्पर्धेत दीक्षा अरविंद जैन हिने आपल्या खेळाचा उत्तम प्रदर्शन दाखविल्यामुळे श्रीनगर गुलमर्ग येथे होणाऱ्या खेलो इंडिया विंटर गेम्स या सर्धेसाठी आइस स्टॉक महाराष्ट्र राज्याच्या संघा मध्ये निवड करण्यात आली आहे व त्याच प्रमाणे जयेश चोगले यांचा देखील महाराष्ट्रा राज्य संघाचे कोच म्हणून खेलो इंडिया विंटर गेम्ससाठी निवड करण्यात आले आहे. रायगड जिल्ह्यातील या विजयी खेळाडू व प्रशिक्षक यांचे सर्वत्र रायगड जिल्ह्यात कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. विजयी खेळाडूंना पुढील वाटचाली साठी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या आहेत.