स्पोर्ट्स

आशिष विलणकर भंडारी श्री २०२३चे मानकरी

रत्नागिरीतील सावरकर नाट्यगृहात स्पर्धा उत्साहात

रत्नागिरी : भंडारी युवा प्रतिष्ठान आयोजीत भंडारी श्री २०२३ ही स्पर्धा रविवार दि. २२ जानेवारी रोजी स्वा.सावरकर नाट्यगृहात पार पडली. ही स्पर्धा रत्नागिरी जिल्हा हौशी शरीरसौष्ठव संघटनेच्या नियमानुसार संपन्न झाली. स्पर्धला दरवर्षीप्रमाणे रत्नागिरीकरांनी अभुतपूर्व प्रतिसाद दिला. या स्पर्धेत ‘भंडारी श्री’ चा मान आशिष विलणकर यांना मिळाला.

स्पर्धचे उद्घाटन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष,निवृत्त जिल्हाधिकारी,ज्येष्ठ साहित्यीक सन्मा.श्री.सासने साहेब यांचे हस्ते, सहयाद्री वाहिनीचे माजी संचालक जयू भाटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले

यावेळी आर. डी. सी.सी.बॅक संचालक गजानन तथा आबासाहेब पाटील, उद्योजक जितेंद्र बागकर, तालुका भंडारी अध्यक्ष श्री. शिवलकर, मधुकर नागवेकर, मिऱ्याच्या सरपंच सौ. आकांक्षा नीलेश किर, सौ. दयाताई चवंडे, शामराव विठ्ल बॅक मॅनेजर श्री.नवले, राजापूर अर्बन बॅंक मॅनेजर श्री.बिर्जे साहेब, वैभव कांबळे, श्री. बावा नाचणकर सर,श्री.नरेंद्र हातिस्कर,डॉ. मयूरेश पाटील, विकीशेठ जैन, भुपेश भाटकर, तेजस भाटकर, कांचन मालगुंडकर,श्री.भाई विलणकर, राष्ट्रीय पंच संदेश चव्हाण आदी मान्यवारांच्या उपस्थीतीत संपन्न झाली.


भंडारी मर्या गटात किताबाचा मानकरी आशिष विलणकर रत्नागिरी तर खुल्या गटात समिर मोरे चिपळूण विजेते ठरले. बेस्ट पोझर प्रणव कांबळी व हर्षद मांडकर राजापूर, उगवता तारा कु. अमेय किर व सुरेश भाताडे रत्नागिरी तर जिद्दी भंडारी निलेश तोडणकर विजेते ठरले.


भंडारी युवा प्रतिष्ठानच्या सर्वच कार्यकत्यांच्या अथक प्रयत्नांमुळे व सर्व स्पाँसर्स यांच्यामुळे स्पर्धा यशस्वी ठरली, त्या सर्वांचे आभार अध्यक्ष नीलेश नार्वेकर यांनी मानले.

Deepak

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button