स्पोर्ट्स
खेडमध्ये आज सायंकाळी दिव्यांगांच्या कबड्डी स्पर्धा
खेड : नगर परिषदेच्या मागील मैदानात स्वर्गीय किशोर कानडे क्रीडानगरीत आज 22 एप्रिलपासून सायंकाळी 6 ते रात्री 11 यावेळेत दिव्यांगांचा कबड्डीचा थरार अनुभवयास मिळणार आहे. 23 एप्रिलपर्यंत ही स्पर्धा रंगणार आहे.
महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन, जिल्हा कबड्डी असोसिएशन, तालुका कबड्डी असोसिएशन व पंच मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने येथील गुरूवर्य ग. रा. चिकने गुरूजी प्रतिष्ठान व जिल्हा दिव्यांग युवा क्रीडा प्रतिष्ठानच्या वतीने कोकणातील प्रथमच दिव्यांगांच्या राज्यस्तरीय पुरूष गटाच्या कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.