तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र उपाध्यक्षपदी मुंबई उपनगरचे विनायक गायकवाड
मुंबई : तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडिया या भारतीय महासंघाशी संलग्न असलेली तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (मुंबई) राज्य संघटनेच उपाध्यक्षपदी मुंबई उपनगरचे विनायक गायकवाड याची निवड करण्यात आली व राज्य संघटना अध्यक्षपदी डॉ. अविनाश बारगजे (बीड)तसेच महासचिव पदी मिलिंद पठारे याची बिनविरोध निवड झाली आहे.
तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडियाचे निरीक्षक ऍड. राजकुमार कश्यप (उत्तर प्रदेश) व औरंगाबाद खंडपीठा चे वकील तथा निवडणून निर्णय अधिकारी विजय ढाकणे यांच्या निर्णयाखाली सन 2023 ते 2027 या कालावधीसाठी कार्यकारी मंडळाची निवडणूक प्रक्रिया पार पाडली. नवी दिल्ली उच्चन्यायालाय च्या आदेशनुसार तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडिया या भारतीय महासंघाची निवडणून पार पडल्यानंतर विविध राज्यातील निवडणूक पार पडल्यानंतर विविध राज्यातील अधिकृत राज्य संघटनांचा निवडणूक प्रक्रिया सुरू आहेत. तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या निर्धेशानुसार तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र मुंबई या राज्य संघटनेचा कार्यकारी मंडळाची निवडणूक औरंगाबाद येते दि. 29 जानेवारी 2023 रोजी पार पडली.
प्रत्येक पदासाठी प्रथेकी एकच अर्ज आल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी जाहीर केले. त्यानुसार अध्यक्ष डॉ . अविनाश बारगजे (बीड), उपाध्यक्षपदी विनायक गायकवाड (मुंबई), धुळीचंद मेश्राम (गोंदिया), महासचिव मिलिंद पठारे सचिव सुभाष पाटील, खजिनदारपदी व्यंकटेशवरराव कररा तर कार्यकारिणी सदस्य नीरज बोरसे (औरंगाबाद) सदस्य अजित घारगे (जळगाव) सतीश खेमस्कर (चंद्रपूर) शिवछत्रपती पुरस्कार खिलाडू तायक्वांदो शिवछत्रपती पुरस्कार राज्य क्रीडा मार्गदर्शक तायक्वांदो असे दोन वेळा पुरस्कार मानकरी प्रवीण बोरसे व सुशांत भोयार याच्यावर अतिरिक्त उपाध्यक्षपदी निवड झाली आहे.
तसेच समिती उपाध्यक्षपदी वृषाली पाटील जोगदंड (नांदेड) राजेश महाजन (उस्मानाबाद) भालचंद्र कुलकर्णी ( सिंधुदुर्ग) सहसचिवपदी लेखा चेत्री (यवतमाळ) कौशिक गरवलीया (ठाणे) विनायक येणापुरे (सांगली) या सर्व नवनिर्वाचित पदाधिकारीचे राज्य व जिल्हाभरातून अभिनंदन करण्यात येत आहे.