स्पोर्ट्स

पहिल्याच स्पर्धेत सांगलीच्या प्रतीक्षा बागडीला ‘महिला महाराष्ट्र केसरी’ बहुमान!

सांगली : महाराष्ट्रात पहिल्यांदाच महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. सांगली येथे ही महिला कुस्ती स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत सांगलीतील प्रतीक्षा बागडी आणि कल्याणमधील वैष्णवी पाटील यांच्यात अंतिम लढत झाली. या लढतीत प्रतीक्षा बागडीने वैष्णवी पाटीलला चितपट करत पहिली महिला महाराष्ट्र केसरी होण्याचा मान पटकावला आहे.


सांगली-मिरज रस्त्यावरील जिल्हा क्रीडा संकुलामध्ये महिला महाराष्ट्र केसरी पदकासाठी कुस्ती स्पर्धा गुरूवारपासून सुरू होत्या. अंतिम सामन्यात तुंग (जि.सांगली) येथील बागडी आणि पाटील यांच्यात लढत झाली. सायंकाळी ही अंतिम लढत सुरू झाली. या अंतिम सामन्यात बागडी व पाटील मध्यंतरापर्यंत चार गुणांनी बरोबरीत होत्या. मात्र, मध्यंतरानंतर बागडीने पाटीलला चितपट करीत चार विरुध्द दहा गुणांनी महिला केसरी पदकावर मोहोर उमटवली.

Deepak

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button