‘फिट रत्नागिरी हॅपी मॅरेथॉन’साठी स्पर्धकांना आज टी-शर्ट आणि बिल्ला नंबर वाटप
रत्नागिरीत उद्या फिट रत्नागिरी हॅपी मॅरेथॉन 2023
रत्नागिरी : फिट रत्नागिरी हॅप्पी मॅरेथॉन 2023 स्पर्धेसाठी नोंदणी केलेल्या धावपटूंना टी-शर्ट आणि बिल्ला नंबर जिल्हा क्रीडा कार्यालय येथे शनिवार दि.18 फेब्रुवारी रोजी सकाळी 11.00 ते 6.00 या वेळेत वितरीत केले जाणार आहेत.
उदयोग मंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत व जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विदयमाने रविवार, 19 फेब्रुवारी 2023 रोजी छत्रपती शिवाजी स्टेडीअम येथे फिट रत्नागिरी हॅप्पी मॅरेथॉन 2023 स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत विविध वयोगटात आणि विविध अंतरासाठी दोन हजार नागरीकांनी सहभाग नोंदवला आहे. सहभाग नोंदवणाऱ्या धावपटूंना टि-शर्ट आणि बिल्ला नंबर जिल्हा क्रीडा कार्यालय येथे शनिवार 18 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 11.00 ते 6.00 या वेळेत वितरीत केले जाणार आहेत. स्पर्धेसाठी सर्व धावपटूंनी रविवार 19 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 5.00 वाजता छत्रपती शिवाजी महाराज स्टेडिअम रत्नागिरी येथे उपस्थित राहावे. स्पर्धेला छत्रपती शिवाजी महाराज स्टेडीअम रत्नागिरी येथून प्रारंभ होणार आहे. सकाळी 5.00 वाजता खेळाडूंच्या वॉर्मअपसाठी झुंबा डांसचे आयोजन करण्यात आले असून सकाळी 5.45 वाजता 21 कि.मी. स्पर्धेस प्रारंभ होईल. त्यानंतर पुढील सर्व स्पर्धा 20 मिनिटांच्या अंतराने सुरु होतील. 21 कि.मी. स्पर्धा छत्रपती शिवाजी महाराज स्टेडीअम रत्नागिरी येथून प्रारंभ होऊन जयस्तंभ मार्गे पावस रोड येथील मुकूल माधव शाळेजवळून परत फिरेल आणि छत्रपती शिवाजी महाराज स्टेडीअम येथे पूर्ण होईल. 10 कि.मी. स्पर्धा छत्रपती शिवाजी महाराज स्टेडीअम रत्नागिरी येथून प्रारंभ होऊन जयस्तंभ मार्गे पावस रोड झरीविनायक मंदीर येथून परत फिरेल आणि छत्रपती शिवाजी महाराज स्टेडीअम येथे पूर्ण होईल.तर 5 कि.मी. स्पर्धा छत्रपती शिवाजी महाराज स्टेडीअम रत्नागिरी येथून प्रारंभ होऊन जयस्तंभ मार्गे भाटये पुलावरुन परत फिरेल आणि छत्रपती शिवाजी महाराज स्टेडीअम येथे पूर्ण होईल.
स्पर्धेचे नियोजन अंतिम टप्प्यात असून धावपटूंसाठी प्रत्येक अनेक टप्प्यांवर उत्साहवर्धक पेय, खाद्यपदार्थ देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. धावपटूंच्या आरोग्याची काळजी म्हणून तीन सुसज्ज अँम्ब्युलन्स तसेच फिरते पायलट पथक नियुक्त करण्यात आले आहे. पोलीस वाहतूक विभागाच्या वतीने धावपटूना कोणताही अडथळा होवू नये यासाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
स्पर्धा पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक गटातील तीन याप्रमाणे म्हणजे 36 विजेत्यांना रोख रक्कम, पदकं आणि
प्राविण्य प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच सहभागी झालेल्या सर्व धावपटूंना सहभाग प्रमाणपत्र
वितरीत करण्यात येतील, असे जिल्हा प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.