Adsense
स्पोर्ट्स

महाराष्ट्र ऑलिम्पिक स्पर्धांची मुख्य क्रीडाज्योत रायगडावरून ४ जानेवारीला निघणार!

अलिबाग : महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने दि.2 ते दि.12 जानेवारी 2023 या कालावधीत शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे-बालेवाडी, पुणे तसेच इतर जिल्ह्यांमध्ये “महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धां”चे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत एकूण 39 क्रीडा प्रकारांचा समावेश असून एकूण 10 हजार 546 खेळाडू, मार्गदर्शक, पंच सहभागी होणार आहेत. एकूण 39 क्रीडा प्रकारांपैकी 19 क्रीडा प्रकारांचे आयोजन हे शिवछत्रपती क्रीडा संकुल पुणे येथे होणार आहे.

या स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर मुख्य क्रीडाज्योत रॅली दि.4 जानेवारी, 2023 रोजी सकाळी 9.00 वा. किल्ले रायगड येथून सुरु होऊन पुणे येथे सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत पुणे येथील शिवछत्रपती क्रीडा संकुल महाळूंगे येथे पोहोचणार आहे.


या मुख्य क्रीडा ज्योती रॅलीच्या आयोजनाकरिता जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय येथे नुकतीच बैठक संपन्न झाली. यावेळी महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांचे जी.टी.सी.सी.सदस्य आणि क्रीडा ज्योत समन्वयक श्री.अमित गायकवाड पुणे आणि जिल्हा क्रीडा अधिकारी रायगड श्री.रविंद्र नाईक हे उपस्थित होते.
जिल्हा प्रशासनाकडून या मुख्य क्रीडा ज्योत रॅलीकरिता सर्वतोपरी सहकार्य केले जाईल,असे जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी यावेळी सांगितले. तसेच महाड उपविभागीय अधिकारी श्रीमती प्रतिमा पुदलवाड आणि महाड नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री.महादेव रोडगे यांनी या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी आवश्यक सर्व परवानग्या तसेच इतर आवश्यक सुविधा तात्काळ उपलब्ध करून देण्याबाबत सूचना दिल्या.


या मुख्य क्रीडा ज्योत रॅलीची सुरुवात किल्ले रायगड येथून दि. 4 जानेवारी 2022 रोजी सकाळी 9.00 वाजता होणार असून प्रसंगी पुणे येथून 20 धावक येणार आहेत. तसेच रायगड जिल्ह्यातून देखील क्रीडापटू धावक सहभागी होतील तसेच इतर शाळा महाविद्यालयाचे विद्यार्थी या क्रीडा ज्योत मध्ये सहभागी होतील.
आयोजन समिती मार्फत किल्ले रायगड येथे फुलांची सजावट करण्यात येणार आहे. मुख्य क्रीडा ज्योत रॅली रायगड येथून निघून ताम्हिणी घाटातून पुणे येथील शिव छत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी येथे पोहोचेल.

Deepak

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button