रत्नागिरीचा अमेय सावंत राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेसाठी रवाना
रत्नागिरीचेच शाहरुख शेख महाराष्ट्र संघाचे व्यवस्थापक
रत्नागिरी : जळगाव येथे झालेल्या राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत सुवर्णपदक मिळवत रत्नागिरीच्या एस. आर. के. तायक्वांदो क्लब मारुती मंदिरचा अमेय सावंत राष्ट्रीय स्पर्धेसाठी रवाना झाला आहे. रत्नागिरीच्या शाहरुख शेख यांची महाराष्ट्र संघाचे व्यवस्थापक म्हणून निवड झाली आहे. राष्ट्रीय स्पर्धेसाठी या गुरू- शिष्याच्या जोडीला ना. उदय सामंत यांनी शुभेच्छा दिल्या.
राजीव गांधी स्टेडियम विशाखापट्टणम, आंध्रप्रदेश इथे 39 वी राष्ट्रीय ज्युनिअर तायक्वांदो स्पर्धा होत आहे. 3 ते 5 फेब्रुवारी या काळात होणाऱ्या या स्पर्धेत महाराष्ट्र संघातून अमेय सावंत सहभागी होणार आहे.
या स्पर्धेसाठी अमेयला राज्य संघटनेचे अध्यक्ष अविनाश बारगोजे, उपाध्यक्ष विनायक गायकवाड आणि धुलीचंद मेश्राम, अतिरिक्त उपाध्यक्ष प्रवीण बोरसे, महासचिव मिलिंद पाठारे, सचिव सुभाष पाटील, खजिनदार व्यंकटेश कररा यांनी शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्र संघाचे व्यवस्थापक म्हणून निवड झाल्याबद्दल शाहरुख शेख यांचे राज्य आणि जिल्हा संघटनेने अभिनंदन केले.