Adsense
स्पोर्ट्स

रत्नागिरीतील युवा तायक्वांदोचे प्रशिक्षक तेजकुमार लोखंडे यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी पंच म्हणून नियुक्ती

रत्नागिरी : पाचवी राष्ट्रीय कॅडेट क्योरॉगी पूमसै राष्ट्रीय स्पर्धा 24 ते 26 फेब्रुवारी दरम्यान तेलंगणा हैद्राबाद गोचीबोली बालयोगी इंडोर स्टेडियम येथे होणार आहे. या राष्ट्रीय तायक्वांडो स्पर्धेसाठी पंच म्हणून रत्नागिरी तायक्वांडो स्पोर्ट्स असोसिएशन सलग्न युवा मार्शल आर्ट तायक्वांडो ट्रेनिग सेंटर रत्नागिरी शाखा साळवी स्टॉप येतील प्रशिक्षण वर्गातील प्रशिक्षक व राष्ट्रीय पंच तेजकुमार लोखंडे याची नियुक्ती झाली आहे.

या संदर्भात तायक्वांडो फेडरेशन ऑफ इंडिया यांनी परिपत्रकाद्वारे जिल्हा संघटनेला ही माहिती दिली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातून तेजकुमार लोखंडे तसेच वृषाली चाव्हण या दोघाचीच निवड झाली आहे.

तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र मुंबईचे अध्यक्ष डॉ. अविनाश बारगजे (बीड), उपाध्यक्ष विनायक गायकवाड (मुंबई), धुळीचंद मेश्राम (गोंदिया), महासचिव मिलिंद पठारे, सचिव सुभाष पाटील, खजिनदार व्यंकटेशवरराव कररा कार्यकारिणी सदस्य नीरज बोरसे (औरंगाबाद) सदस्य अजित घारगे (जळगाव) सतीश खेमस्कर (चंद्रपूर) शिवछत्रपती पुरस्कार विजेते, शिवछत्रपती पुरस्कार विजेते राज्य क्रीडा मार्गदर्शक तायक्वांदअतिरिक्त उपाध्यक्ष प्रवीण बोरसे सुभाष पाटील तांत्रिक कमिटी अध्यक्ष सुशांत भोयार, समिती उपाध्यक्ष वृषाली पाटील जोगदंड (नांदेड), राजेश महाजन (उस्मानाबाद), भालचंद्र कुलकर्णी ( सिंधुदुर्ग), सहसचिव लेखा चेत्री (यवतमाळ), कौशिक गरवलीया (ठाणे), विनायक येणापुरे (सांगली), रत्नागिरी तायक्वांडो असोसिएशनचे उपाध्यक्ष शैलेश गायकवाड (P S I), श्री विश्वदास लोखंडे(उपाध्यक्ष), जिल्हा महासचिव श्री लक्ष्मण कररा (5th dan ब्लॅक बेल्ट ), जिल्हा कोषाध्यक्ष शशांक घडशी (शासनाचे मार्गदर्शक पुरस्कार विजेते), युवा तायक्वांडो असोसिएशनचे अध्यक्ष श्री राम कररा (शासनाचे युवा पुरस्कार विजेते) यांनी या दोन्ही पांचाना शुभेच्छा दिल्या.

In article

Deepak

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button