रत्नागिरीत ६७ व्या जिल्हास्तरीय भव्य नाईट हॉलीबॉल स्पर्धेचा शुभारंभ
रत्नागिरी : राजवाडी क्रीडा मंडळ, भगवती बंदर, रत्नागिरी आयोजित जिल्हास्तरीय भव्य नाईट हॉलीबॉल स्पर्धेचा शुभारंभ सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त नागनाथ बहादूले यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी मंडळाचे अध्यक्ष सुधाकर मोंडकर, अल्ट्राटेक सिमेंट ककंपनीचे असिस्टंट व्हॉइस प्रेसिडेंट डी.एस.चंद्रशेखर, मॅनेजर संतोष पाटील, रवींद्र फलणीकर, प्रवीण दळवी श्रीरंग कुबल,विजय चव्हाण, संदेश सारंग, प्रवीण बापर्डेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
दरवर्षी अक्षय्यतृतीयानिमित्त राजवाडी क्रीडा मंडळ या हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करत असते. जिल्ह्यातील मानाची अशी समजल्या जाणाऱ्या या स्पर्धेचे यंदा 67 वे वर्ष आहे. तीन दिवसीय या स्पर्धेत जिल्ह्यातील एकूण 24 संघांनी सहभाग घेतला असून या स्पर्धेचा पहिला सामना भगवती स्पोर्ट विरुद्ध काळबादेवी यांच्यात खेळविण्यात आला. या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी राजवाडी क्रीडा मंडळाचे सर्व सदस्य मेहनत घेत आहे.