राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत रत्नागिरीच्या युवा अकॅडमीला दोन सुवर्ण व रौप्यपदक
रत्नागिरी : जळगाव येथील राज्य स्पर्धेत रत्नागिरी जिल्हा संघात रत्नागिरी तालुक्यातील युवा मार्शल आर्ट तायक्वांदो ट्रेनिंग सेंटर साळवी स्टॉप शाखा या अकॅडमीच्या सिनियर खेळाडूंनी फ्री स्टाईल पम्मसे व क्योरॉगी फाईटमध्ये सौ. शाशिरेखा कररा (सुवर्ण पदक), अमित जाधव (सुवर्ण पदक) तर ज्युनियर संघात कू.मयुरी कदम (रौप्यपदक संपादन करून रत्नागिरी तालुका आणि जिल्हयाचे नाव उंचावले आहे.
तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडियाच्या मान्यतेने तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रा व जळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने ३२ वी महाराष्ट्र राज्य ज्युनियर तायक्वांदो अजिंक्यपद तायक्वांदो स्पर्धा दि. २६ ते २८ जानेवारी दरम्यान श्री छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल, जळगाव या ठिकाणी संपन्न झाल्या. या स्पर्धेसाठी राज्यभरातून सुमारे ६०० खेळाडूंनी सहभाग घेतला होता.
या स्पर्धेत बाजी मारलेल्या रत्नागिरीतील खेळाडूंना तायक्वांडो फेडरेशन ऑफ इंडियाचे महासचिव मिलिंद पठारे (शिवछत्रपती पुरस्कार विजेते) रत्नागिरी जिल्हा तायक्वांडो असोसिएशनचे अध्यक्ष व महाराष्ट्र तायक्वांडो असोसिएशन सन्मानित पदाधिकारी (शासनाचे जिल्हा संघटक पुरस्कार विजेते) श्री. वेंकटेश्वरराव कररा जिल्हा महासचिव श्री लक्ष्मण कररा (5th dan ब्लॅक बेल्ट) जिल्हा कोषाध्यक्ष शशांक घडशी (शासनाचे मार्गदर्शक पुरस्कार विजेते) युवा तायक्वांडो असोसिएशन चे अध्यक्ष श्री राम कररा (शासनाचे युवा पुरस्कार विजेते) यांनी अभिनंदनीय शुभेच्छा दिल्या.