स्पोर्ट्स

राष्ट्रीय तायक्वांडो अजिंक्यपद स्पर्धेसाठी साहिल घडशीची निवड


देवरूख (सुरेश सप्रे ) : तायक्वांडो फेडरेशन ऑफ इंडियाच्या मान्यतेने तायक्वांडो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र व जळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने 32वी महाराष्ट्र राज्य ज्युनियर तायक्वांडो अजिंक्यपद स्पर्धा दि. 26 ते 28 जानेवारी दरम्यान श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रिडा संकुल जळगाव येथे उत्साहात संपन्न झाल्या. या स्पर्धेसाठी राज्यभरातून सुमारे 600 खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता.

या राज्य स्पर्धेत रत्नागिरी जिल्हा संघाचे प्रतिनिधित्व संगमेश्वर तालुका तायक्वांडो अकॅडमीच्या अंतर्गत सुरू असलेल्या नगर पंचायत देवरुख तायक्वांडो क्लबच्या 4 तायक्वांडो पट्टुंनी सहभाग नोंदविला होता. या मध्ये 46 ते 48 या वाजनी गटातमध्ये साहिल शशांक घडशी अतिशय उत्कृष्ट कामगिरीचे प्रदर्शन करत सुवर्णपदक पटकावले,राज रोशन रसाळ याने 75 ते 78 या वजनी गटातमध्ये अतिशय उत्कृष्ट कामगिरीचे प्रदर्शन करत कांस्यपदक पटकावले. धनंजय देवीदास जाधव याने 46 किलो आतील वजनी गटातमध्ये व राहुल सागर चव्हाण याने 51 ते 55 या वजनी गटामध्ये अतिशय चांगल्या कामगिरीचे प्रदर्शन केले. या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये सुवर्णपदक पटकावलेल्या साहिल घडशी याची निवड 3 ते 5 फेब्रुवारी दरम्यान विशाखापट्टणम आंध्रप्रदेश येथे होणाऱ्या अजिंक्यपद राष्ट्रीय तायक्वांडो स्पर्धेसाठी झाली आहे.


या खेळाडूंना अध्यक्ष माजी आ. डॉ. सुभाष बने, रोहन बने क्लबच्या अध्यक्षा सौ. स्मिता लाड, माजी सभापती नंदादीप बोरूकर, प्रमुख प्रशिक्षक शशांक घडशी चिन्मय साने,क्लबच्या उपाध्यक्षा सौ.पूनम चव्हाण,संदेश जागुष्टे आदी मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.

Deepak

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button