संगमेश्वर तालुक्यातील ४ खेळाडूंची राज्यस्तरीय तायक्वांडो स्पर्धेसाठी निवड
जळगाव मध्ये ३२ वी राज्य ज्युनिअर तायकांडो स्पर्धा २६ पासून
देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील नगर पंचायत देवरुख तायक्वांडो क्लबचे राज रसाळ, साहिल घडशी, धनंजय जाधव, राहुल चव्हाण या खेळाडूंची राज्य स्पर्धेसाठी निवड झाली असून ते रत्नागिरी जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
तायक्वांडो फेडरेशन ऑफ इंडियाच्या मान्यतेने तायक्वांडो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रा व जळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने 32वी महाराष्ट्र राज्य ज्युनियर तायक्वांडो अजिंक्यपद तायक्वांडो स्पर्धा दि.26 ते 28 जानेवारी दरम्यान श्री छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रिडा संकुल जळगाव. या ठिकाणी संपन्न होत असून या स्पर्धेसाठी राज्यभरातून सुमारे 600 खेळाडू सहभागी होणार आहे.
त्यांना शुभेच्छा देण्याचा कार्यक्रम पी.एस.बने इंटरनॅशनल स्कूल.साडवली या येथे अकॅडमीचे अध्यक्ष माजी आम. डॉ. सुभाष बने,जि. प. माजी अध्यक्ष रोहन बने यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.यावेळी देवरूख क्लबच्या सौ.स्मिता लाड, ॲड.पूनम चव्हाण, संदेश जागुष्टे, प्रशिक्षक शशांक घडशी व स्वप्निल दांडेकर,आदी मान्यवर उपस्थित होते. या निवड झालेल्या खेळाडूंचे आमदार शेखर निकम,देवरुख शहराच्या नगराध्यक्षा मृणाल शेट्ये,उपनगराध्यक्ष वैभव पवार, आदींनी शुभेच्छा दिल्या.