अहमदाबाद-करमाळी विशेष रेल्वे गाडी २४ जानेवारीला धावणार
सावर्डे, आरवली, आडवली, विलवडेसह, नांदगाव वैभववाडीलाही थांबणार
रत्नागिरी : अहमदाबाद येथून गोव्यातील करमाळीपर्यंत कोकण रेल्वे मार्गे विशेष ट्रेन दिनांक 24 जानेवारी रोजी चालविले जाणार आहे. या मार्गावरील प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन रेल्वे कडून ही विशेष गाडी चालवली जाणार आहे.
ही गाडी (०९४७०) दिनांक 24 जानेवारी रोजी अहमदाबाद येथून सकाळी ९.३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे चार वाजून पंचवीस मिनिटांनी ती गोव्यात करमाळीला पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही विशेष गाडी (०९४६९) करमाळी येथून दिनांक २५ जानेवारी २०२३ रोजी सकाळी नऊ वाजून वीस मिनिटांनी सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ती सकाळी सात वाजता ती अहमदाबादला पोहोचेल.
आपल्या प्रवासात ही गाडी वडोदरा, सुरत, वापी, पालघर, वसई रोड, पनवेल, रोहा, रोहा, खेड, चिपळूण, सावर्डे, आरवली, संगमेश्वर, रत्नागिरी, अडवली, विलवडे, राजापूर वैभववाडी, नांदगाव, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी तसेच थिवी स्थानकावर थांबे घेणार आहे.
एकूण 22 डब्यांच्या या गाडीला वातानुकूलित स्लीपर तसेच सेकंड सीटिंगसह जनरेटर कार याप्रमाणे कोच रचना असणार आहे.