कोकणातून धावणाऱ्या आणखी चार एक्सप्रेस गाड्या विद्युत इंजिन सहज धावणार!
रत्नागिरी : कोकण रेल्वेमार्गे धावणारी एर्नाकुलम – ओखा एक्सप्रेस दिनांक 20 जानेवारीपासून विद्युत इंजिनवर धावू लागली आहे. याचबरोबर तिरुअनंतपुरम सेंट्रल ते वेरावल, नागरकोईल- गांधीधाम तसेच एर्नाकुलम ते निजामुद्दीन दरम्यान धावणारी नियमित एक्सप्रेस गाडी अशा चार एक्सप्रेस गाड्या आता विद्युत इंजिन सहज चालवल्या जाणार आहेत.
कोकण रेल्वेच्या संपूर्ण मार्गाचे विद्युतीकरण पूर्ण झाल्यामुळे या मार्गे धावणाऱ्या अनेक गाड्या विद्युत इंजिनसह चालवल्या जात आहेत. उर्वरित गाड्या देखील विद्युत इंजिन सह चालवण्याचे नियोजन इंजिन उपलब्धतेनुसार रेल्वेकडून केले जात आहे. यानुसार कोकण रेल्वेकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार कोकण रेल्वे मार्गे धावणारी 16338/16337 एरणाकुलम-ओखा एक्सप्रेस अहमदाबाद दरम्यान विद्युत इंजिन सह चालवण्यास सुरुवात झाली आहे.
या गाडीबरोबरच 16 334 /16 333 तिरुअनंतपुरम सेंट्रल – वेरावल ही गाडी तिरुअनंतपुरम सेंटर वरून 23 जानेवारीच्या फेरीपासून तर प्रवासात ही गाडी दि. 26 जानेवारी 2023 पासून तिरुअनंतपुरम ते अहदाबाद दरम्यान विद्युत इंजिनसह चालवली जाईल. नागरकोईल ते गांधीधाम दरम्यान धावणारी 16 336 /16 335 ही एक्सप्रेस गाडी विद्युत इंजिनसह चालवली जाणार आहे. नागरकोईल येथून ही गाडी 24 जानेवारीपासून तर अहदाबाद येथून ही गाडी 27 जानेवारीपासून विद्युत इंजिन जोडून चालवली जाईल.
कोकण रेल्वे मार्ग धावणारी चौथी एक्सप्रेस गाडी 22 655 22 656 एरणाकुलम ते हजरत निजामुद्दीन साप्ताहिक एक्सप्रेस एरनाकुलम येथून 25 जानेवारीपासून तर दिल्ली एरणाकुलम दरम्यान धावताना ही गाडी 27 जानेवारीपासून विजेवर चालवली जाणार आहे.