कोकणातून धावणाऱ्या समर स्पेशल कन्याकुमारी एक्सप्रेसच्या क्रमांकात बदल
रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गे जाहीर करण्यात आलेली समर स्पेशल एक्सप्रेस मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस ते कन्याकुमारी दरम्यान चालवली जाणार आहे. ही गाडी देखील आठवड्यातून एकदाच धावणार आहे. या आधी या गाडीचा क्रमांक 01463/01464 असा जाहीर करण्यात आला होता मात्र तो 01465 / 01466 असा असेल अशी माहिती कोकण रेल्वेकडून देण्यात आली आहे.
दि. ६ एप्रिल ते १ जून २०२३ या कालावधीत दर मंगळवारी ही गाडी धावेल. लोकमान्य टिळक टर्मिनसवरून ही गाडी सायंकाळी चार वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री ते अकरा वाजून वीस मिनिटांनी कन्याकुमारीला पोहोचेल. कन्याकुमारी येथून ही गाडी आठ एप्रिल ते तीन जून 2023 या कालावधीत प्रत्येक शनिवारी धावणार आहे. ही गाडी कन्याकुमारी येथून दुपारी सव्वा दोन वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ती रात्री नऊ वाजून पन्नास मिनिटांनी मुंबईत लोकमान्य टिळक टर्मिनस ला पोहोचेल.