रेल्वे अपडेट्स & ट्रॅव्हल
कोकण रेल्वेमार्गे धावणाऱ्या एक्सप्रेसला स्लीपरचा जादा डबा
रत्नागिरी : कोकण रेल्वे धावणाऱ्या जामनगर ते तिरुनेलवेली (19578/19577) एक्सप्रेसला स्लीपर श्रेणीचा एक डबा वाढवण्यात आला आहे. या मार्गे धावणाऱ्या गाड्यांना प्रवाशांची गर्दी होत असल्यामुळे रेल्वेने हा निर्णय घेतला आहे.
जामनगर ते तिरूनेलवेली या फेरीसाठी या गाडीला आज दिनांक 3 फेब्रुवारी तसेच तिरूनेलवेली ते जामनगर या फेरीसाठी दिनांक 6 फेब्रुवारी रोजी जादा डबा जोडला जाणार आहे.