कोकण रेल्वेमार्गे धावणाऱ्या दोन एक्सप्रेसना जादा काेच
हापा मडगावसह पाेरबंदर काोचुवेली एक्स्पेसचा समावेश
रत्नागिरी : उन्हाळी हंगामामुळे कोकण रेल्वे मार्गावरील गर्दी वाढल्यामुळे या मार्गावरून जाणाऱ्या दूर पल्ल्याच्या दोन एक्सप्रेस गाड्यांना तात्पुरत्या स्वरूपात डबे वाढवण्यात आले आहेत. या दोन गाड्यांमध्ये हापा मडगाव तसेच पोरबंदर कोचुवेली या दोन एक्सप्रेसचा समावेश आहे.
या संदर्भात कोकण रेल्वे गेलेल्या माहितीनुसार आपा ते मडगाव दरम्यान धावणाऱ्या (22908) गाडीला दि. 19 एप्रिल रोजीच्या फेरीसाठी तर मडगाव ते हापा (22907) या दिनांक 21 एप्रिल 2023 रोजी स्लीपर श्रेणीचा एक डबा अतिरिक्त जोडण्यात येणार आहे.
याचबरोबर पोरबंदर ते कोचुवेली (22910/22909) या मार्गावर धावणाऱ्या गाडीला पोरबंदर कोचुवेली फेरीसाठी दिनांक वीस तर कोचीवेली ते पोरबंदर या फेरीसाठी दि. 23 एप्रिल 2023 रोजी स्लीपर श्रेणीचा एक अतिरिक्त डबा जोडण्यात येणार आहे.