रेल्वे अपडेट्स & ट्रॅव्हल

कोकण रेल्वे मार्गावर रत्नागिरीसाठी अनारक्षित गाड्यांच्या विशेष फेऱ्या

रत्नागिरी : आयत्यावेळी प्रवासाचे नियोजन करणाऱ्या सर्वसामान्य प्रवाशांना रेल्वेने खुशखबर दिली आहे. पुणे- रत्नागिरी तसेच रत्नागिरी ते पनवेल या मार्गावर अनारक्षित गाड्यांच्या विशेष फेऱ्या जाहीर करण्यात आल्या आहेत.

या संदर्भात कोकण रेल्वेकडून प्राप्त माहितीनुसार lगाडी क्र. ०११३१ पुणे जं. – रत्नागिरी अनारक्षित विशेष (साप्ताहिक) पुणे जंक्शन येथून दि. 04/05/2023, 11/05/2023, 18/05/2023 आणि 25/05/2023 रोजी म्हणजे दर गुरुवारी 20:50 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 7.30 वाजता रत्नागिरीला पोहोचेल.

गाडी क्र. 01132 रत्नागिरी – पुणे जं. अनारक्षित विशेष (साप्ताहिक) रत्नागिरी येथून दर शनिवारी 06/05/2023, 13/05/2023, 20/05/2023 आणि 27/05/2023 रोजी 13:00 वाजता सुटून पुणे जंक्शनला त्याच दिवशी 23:55 वाजता पोहोचेल.

ही गाडी लोणावळा, कल्याण, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड आणि संगमेश्वर रोड स्थानकावर थांबणार आहे.

त्या गाडीला एकूण 22 डबे असतील. यात सामान्य – 20 कोच, SLR – 02 याप्रमाणे कोचरचना असेल.

गाडी क्र. 01133 / 01134 रत्नागिरी – पनवेल – रत्नागिरी अनारक्षित विशेष (साप्ताहिक)

ही गाडी क्र. 01133 रत्नागिरी – पनवेल अनारक्षित विशेष (साप्ताहिक) रत्नागिरी येथून 05/05/2023, 12/05/2023, 19/05/2023 आणि 26/05/2023 रोजी दर शुक्रवारी 13:00 वाजता सुटून ती ट्रेन त्याच दिवशी 20.30 वाजता पनवेलला पोहोचेल.

गाडी क्र. 01134 पनवेल – रत्नागिरी अनारक्षित विशेष (साप्ताहिक) पनवेल येथून 05/05/2023, 12/05/2023, 19/05/2023 आणि 26/05/2023 रोजी दर शुक्रवारी 21:30 वाजता सुटेल. ट्रेन दुसऱ्या दिवशी 04:30 वाजता रत्नागिरीला पोहोचेल.

ही गाडी संगमेश्वर रोड, आरवली रोड, सावर्डे, चिपळूण, खेड, वीर, माणगाव आणि रोहा स्थानकावर थांबेल.

या गाडीला एकूण 22 कोच असतील. यात सामान्य – 20 कोच, SLR – 02 डबे असतील.

Deepak

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button