रेल्वे अपडेट्स & ट्रॅव्हल
कोकण रेल्वे मार्गावर २१ रोजी धावणार वन-वे स्पेशल ट्रेन
खेड, चिपळूण रत्नागिरीसह कणकवलीला थांबणार
रत्नागिरी : मुंबई सीएसएमटी ते मडगाव दरम्यान वन -वे स्पेशल ट्रेन दिनांक २१ जानेवारी रोजी धावणार आहे. मुंबईतून मध्यरात्रीनंतर बारा वाजून वीस मिनिटांनी ही गाडी सुटणार असून त्याच दिवशी ती गोव्यात मडगावला पोहोचणार आहे.
या संदर्भात कोकण रेल्वे दिलेल्या माहितीनुसार गाडी क्रमांक 01471 ही मुंबई सीएसएमटी येथून मध्यरात्रीनंतर 12.20 वाजता सुटेल आणि दुपारी 12.15 वाजता ती मडगावला पोहोचेल. ही गाडी आपल्या प्रवासात दादर, ठाणे, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सावंतवाडी तसेच करमाळी हे थांबे घेत मडगावला विसावणार आहे.
एकूण १७ डब्यांच्या या गाडीला स्लीपरचे १५ तर एस एल आर श्रेणीचे दोन डबे जोडण्यात येणार आहेत