कोकण रेल्वे मार्गे धावणाऱ्या दोन एक्सप्रेस गाड्यांना जादा डबे
रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्ग धावणारी हापा ते मडगाव एक्सप्रेस दि. 5 एप्रिल रोजी स्लीपर श्रेणीच्या अतिरिक्त डब्यासह धावणार आहे. कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या गाड्यांना प्रवाशांची गर्दी होऊ लागल्यामुळे रेल्वेने हा निर्णय घेतला आहे.
या संदर्भात कोकण रेल्वेकडून प्राप्त माहितीनुसार हापा ते मडगाव (22908) ही गाडी दिनांक ५ एप्रिलच्या फेरीसाठी तर परतीच्या प्रवासात असताना मडगाव ते हापा एक्सप्रेस (22907) दिनांक 7 एप्रिल रोजी स्लीपर श्रेणीच्या एका अतिरिक्त डब्यासह धावणार आहे.
याचबरोबर पोरबंदर ते कोचुवेली एक्सप्रेस (20910) ही कोकण रेल्वे मार्गे धावणारी दुसरी एक्सप्रेस गाडी दिनांक 6 एप्रिल रोजी स्लीपर श्रेणीच्या एका अतिरिक्त डब्यासह आहे. परतीच्या फेरीत ही गाडी कोचुवेली ते पोरबंदर अशी धावताना (20910) दिनांक 9 एप्रिल रोजी ज्यादा डब्यासह धावणार आहे.