महाराष्ट्ररेल्वे अपडेट्स & ट्रॅव्हल
कोकण रेल्वे मार्गे धावणाऱ्या दोन एक्सप्रेस गाड्यांना जादा डबा
रत्नागिरी : सुट्टीला गेलेल्या प्रवाशांची रेल्वे गाड्यांना गर्दी होऊ लागल्यामुळे कोकण रेल्वे मार्गावरील आणखीन दोन एक्सप्रेस गाड्यांना जादा डबे जोडण्यात येणार आहेत.
या संदर्भात कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार हापा ते मडगाव (22 908) तसेच मडगांव -हापा (22907 ) या गाडीला स्लीपर श्रेणीचा एक डबा अतिरिक्त जोडण्यात येणार आहे. या संदर्भात प्राप्त माहितीनुसार हापा ते मडगाव या फेरीसाठी दिनांक सात जूनला तर मडगाव ते हापा या फेरीसाठी 9 जूनला स्लीपर चा ज्यादा डबा जोडला जाणार आहे.
याचबरोबर पोरबंदर ते कोचुवेली (20910) या गाडीला दिनांक आठ जून रोजी तर कोचुवेली पोरबंदर (20909) या फेरीसाठी दिनांक 11 जून रोजी स्लीपर चा एक अतिरिक्त कोच जोडण्यात येणार आहे