रेल्वे अपडेट्स & ट्रॅव्हल
कोकण रेल्वे मार्गे धावणाऱ्या पोरबंदर- कोचुवेली एक्सप्रेसला अतिरिक्त डबा

रत्नागिरी : सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाचे स्वागत करण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या गर्दीमुळे कोकण रेल्वे मार्गे धावणाऱ्या गाड्या हाऊसफुल्ल होत आहेत. या पार्श्वभूमीवर या मार्गे धावणारी पोरबंदर -कोचुवेली एक्सप्रेसला जादा डबा जोडण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे.
या संदर्भात कोकण रेल्वेकडून प्राप्त माहितीनुसार पोरबंदर ते कोचुवेली (20910) या गाडीला दिनांक 29 डिसेंबर 2022 साठी तर याच गाडीच्या परतीच्या फेरीसाठी (20909) दिनांक १ जानेवारी २०२३ करिता स्लीपर श्रेणीचा एक अतिरिक्त डबा जोडण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला आहे. या गाडी गाडीचे आरक्षण केलेल्या आणि प्रतिक्षा यादीवर असलेल्या प्रवाशांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन रेल्वे कडून करण्यात आले आहे
