कोकण रेल्वे मार्गे ११ रोजी धावणार वन-वे स्पेशल ट्रेन!
रत्नागिरी : इंदूर ते मंगळूरु अशी कोकण रेल्वे मार्गे धावणारी वनवे स्पेशल ट्रेन दि. 11 मे रोजी मध्यप्रदेशमधील इंदूर येथून कोकण रेल्वे मार्गावर येण्यासाठी सुटणार आहे. ही विशेष गाडी उज्जैन जंक्शन, सुरत, वसई मार्गे कोकण रेल्वे मार्गावर येणार आहे.
या संदर्भात रेल्वे कडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार वन वे स्पेशल गाडी क्र. ०९३०२ इंदूर – मंगळुरु जं. ही गुरुवार दि.11 मे 2023 रोजी इंदूरहून 11:15 वाजता सुटेल व मंगळुरु जंक्शनला दुसऱ्या दिवशी 16:15 वाजता पोहोचेल.
आपल्या प्रवासात ही गाडी देवास, उज्जैन जंक्शन, नागदा जंक्शन, सुरत, वलसाड, वापी, पालघर, वसई रोड, पनवेल, रोहा, रत्नागिरी, राजापूर रोड, कुडाळ, थिविम, करमाळी, मडगाव जंक्शन, कारवार आणि उडुपी या स्टेशनवर थांबे घेणार आहे.
या गाडीला एकूण 21 कोच असतील. यामध्ये 3 टायर एसी – 01 कोच, स्लीपर – 18 कोच,तर SLRचे – 02 कोच या गाडीला जोडण्यात जोडले जाणार आहेत.