कोचुवेली-पोरबंदर एक्सप्रेसच्या दोन फेऱ्यांना जादा डबा
रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गे धावणाऱ्या पोरबंदर कोचवेली एक्सप्रेसच्या दोन फेऱ्यांना स्लीपर श्रेणीचा जादा डबा जोडण्यात येणार आहे. दि. ४ तसेच ७ मे २०२३ रोजी या गाडीला स्लीपरचा अतिरिक्त कोच जोडण्यात येणार आहे. पालघर, वसई, पनवेल रत्नागिरी मडगाव मार्गे ही गाडी लक्ष्मी येथील कोचीवेलीला
उन्हाळी हंगामामुळे कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांना गर्दी होत असल्यामुळे रेल्वेने प्रवाशांची मागणी असलेल्या गाड्यांना अतिरिक्त डबे जोडण्याचे धोरण स्वीकारले आहेत. यानुसार पोरबंदर ते कोचुवेली या कोकण रेल्वे मार्गे धावणारे एक्सप्रेस गाडीला स्लीपर श्रेणीचा एक अतिरिक्त कोच जोडण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
या संदर्भात कोकण रेल्वे कडून प्राप्त माहितीनुसार पोरबंदर ते कोचुवली (20910) या फेरीसाठी दिनांक 4 मे रोजी तर कोचुवेली ते पोरबंदर या फेरीसाठी (20909) दिनांक ७ मे 2023 रोजी स्लीपरचा ज्यादा डबा जोडला जाणार आहे.