रेल्वे अपडेट्स & ट्रॅव्हल
कोलकातामध्ये लोकल ट्रेन रुळावरून घसरली
मेढा (कोलकाता ) : कोलकाता मध्ये उपनगरीय वाहतुकीची धावती लोकल ट्रेन घसरली आहे. या अपघातातनंतर रेल्वे सेवा विस्कळीत झाली असून जीवित हानी टळली आहे.
कोलकातामधील मेढा भागात ही दुर्घटना घडली. ही दुर्घटना घडलेल्या भागातील रेल्वे सेवा बाधित झाली आहे. लोकल सेवेतील EMU चा रेक घसरल्याने प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. घसरलेली लोकल ट्रेन पुन्हा रुळावर आणण्यासाठी रेल्वे कडून युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. बुधवारी रात्री उशिरापर्यंत हे प्रयत्न सुरू होते.